‘युगवाणी’चा हा ‘अरुण कोलटकर विशेषांक’ म्हणजे कोलटकरांच्या व्यक्तिमत्त्वाची सगळी रूपे एकत्रितपणे पाहण्याचा आणि त्यांना सगळ्या अंगाने समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे

कोलटकरांच्या कवितेचे अभ्यासक, तज्ज्ञ, कोलटकरांचे सहकारी, छायाचित्रकार, अनुवादक, दृक्-कलावंत सगळे आपापले डोळे घेऊन एकत्र आले आहेत. या अंकामुळे आपल्या परंपरेतला हा अनन्यसाधारण कवी अधिक कळेल, त्याचं समग्र रूप समजून घ्यायची निकड आपल्याला भासेल अशी अपेक्षा आहे. या छोट्याशा प्रयत्नातून कोलटकरांच्या व्यक्तिमत्वाचा कितीसा थांग आपल्याला लागतो याचा निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे.......